धुळे धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन; १८ वर्षीय अविवाहित तरुणीचा मृत्यू

---Advertisement---

 

शहराजवळील एका गावात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्भपातासाठी घेतलेल्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने १८ वर्षीय अविवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची अचानक प्रकृती खालावल्याने तिला देवपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान ती सुमारे २४ आठवड्यांची (६ महिने) गरोदर असल्याचे डॉक्टरांना आढळले. गरोदरपणा लपवण्यासाठी किंवा गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिने काही औषधांचे सेवन केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


दरम्यान, गोळ्यांचे अतिसेवन झाल्यामुळे तरुणीचा रक्तदाब झपाट्याने घसरला आणि तिला झटके येऊ लागले. प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. इतक्या मोठ्या कालावधीचा गर्भपात करण्यासाठी संबंधित तरुणीला औषधे कोणी दिली? यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का? यासह इतर सर्व बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---