---Advertisement---
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव निलेश पाटील असे असून ते चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे राहत होते. रविवारी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनीही ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.









