जम्मू-काश्मीरमध्ये भीषण बस अपघात; 17 जणांचा मृत्यू, 31 जखमी

---Advertisement---

 

उधमपूर जिल्ह्यातील रामनगर–कठुआ मार्गावर आज सकाळी भीषण बस अपघात झाला. प्रवाशांनी खचून भरलेली बस डोंगराळ रस्त्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन दरीत कोसळली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून 31 प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस रामनगरहून उधमपूरकडे येत होती. सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर परिसरात एकच आक्रोश पसरला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.


अपघातात अनेक प्रवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---