वाढते तापमान व ओव्हरलोडमुळे भुसावळमध्ये कब्रस्तान परिसरात इलेक्ट्रिक डीपीला आग; वीजपुरवठा खंडित

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मुस्लिम कब्रस्तान परिसरात भर दुपारी इलेक्ट्रिक डीपीला आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सध्याचे वाढते तापमान आणि ओव्हरलोडमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र, या आगीमुळे खडका रोड आणि अमरदीप टॉकीज परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. घटनेची माहिती मिळताच वीज वितरण विभाग आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.

सध्या वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---