वरणगाव शहरात वारंवार वीज खंडित; संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘रिकामी खुर्ची’ला हार घालून केला निषेध…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या वाढत्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

भर दुपारच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी पदाधिकारी वीज वितरण कार्यालयात पोहोचले. मात्र, त्यावेळी अभियंता हजर नसल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

वीज वितरण कंपनीकडून कधी झाडांची छाटणी, कधी रोहीत्र दुरुस्ती, तर कधी तुटलेल्या तारांच्या दुरुस्तीच्या कारणावरून दिवसातून ३ ते ४ तास वीजपुरवठा बंद ठेवला जातो. याबाबत मोबाईलद्वारे पूर्वसूचना दिली जात असल्याने नागरिक काही प्रमाणात तयारी करतात. मात्र, रात्रीच्या वेळी अचानक होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे वीज खंडित होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिक वेळेवर वीज बिल भरत असूनही त्यांना सतत वीजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे.

जर येत्या २ ते ३ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या समस्येमुळे वरणगाव शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---