सोन्या चांदीने गेल्या चार दशकाचा घसरणीचा विक्रम मोडला…! 23 दिवसात सोन्याच्या भावात 35 हजारांची, चांदीच्या भावात 85 हजारांची घसरण….!

---Advertisement---

 

सोन्या-चांदीच्या बाजारात उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या चार दशकांचा विक्रम मोडत सोन्या-चांदीच्या दरात सलग २३ दिवस घसरण सुरू आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतक्या सातत्याने दर घसरल्याने बाजारात खळबळ उडाली आहे.

फक्त मागील २४ तासांतच सोन्याच्या दरात तब्बल ८ हजार रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात तब्बल २० हजार रुपयांनी घट झाली आहे. गेल्या २३ दिवसांचा विचार केला तर सोन्याचे दर सुमारे ३५ हजार रुपयांनी खाली आले आहेत, तर चांदीचे दर तब्बल ८५ हजार रुपयांनी कोसळले आहेत.

१ मार्च २०२६ रोजी सोन्याचा दर १ लाख ७० हजार ५०० रुपये इतका होता, तर चांदीचा दर २ लाख ९५ हजार रुपयांवर होता. मात्र आजच्या घडीला सोनं १ लाख ३६ हजार रुपयांवर तर चांदी २ लाख १० हजार रुपयांवर आली आहे. या मोठ्या घसरणीमुळे बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

तज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती आणि त्यातून घडणाऱ्या आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरचे चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा बदलता कल यामुळे ही घसरण होत असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून खरेदीसाठी ही योग्य संधी मानली जात आहे. मात्र दुसरीकडे गुंतवणूकदार आणि सोन्याचे व्यापारी यांची चिंता वाढली आहे.

एकूणच, सोन्या-चांदीच्या दरातील ही ऐतिहासिक घसरण पुढील काळात अर्थव्यवस्थेवरही परिणाम करू शकते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---