24 तासांच्या विश्रांतीनंतर सोने चांदीच्या भावात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे भाव काय ?

---Advertisement---

 

जळगाव सुवर्णनगरी गेल्या 24 तासांच्या विश्रांतीनंतर सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाल्याचा समोर आला आहे. 24 तासांच्या विश्रांतीनंतर आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयांचे वाढ झाली असून जीएसटी विना सोन्याचा भाव हा 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे तर जीएसटी विना चांदीच्या दरातही 5 हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीचा भाव 2 लाख 60 हजार रुपयांवर गेला आहे.

तर जळगाव सुवर्णनगरीमध्ये जीएसटी सह सोन्याचे भाव हे 1 लाख 59 हजार 100 रुपयांवर येऊन पोहोचले आहेत. तर जीएसटी सह चांदीचे भाव 2 लाख 67 हजार 800 रुपयांवर येऊन पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार तसेच जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असल्याचं सराफ व्यावसायिकांचं मत आहे आगामी काळातही सोने चांदीच्या दरामध्ये चढ-उतार हे सुरू राहणार असल्याची शक्यता सोने तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---