गुढीपाडव्याचा मुहूर्त ठरला ‘सोनेरी’; सोन्याच्या भावात 12 हजार तर चांदीच्या भावात 27 हजार रुपयांची मोठी घसरण…..!

---Advertisement---

 

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीची मोठी संधी मिळाली आहे.

सोन्याच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची घट झाली असून चांदीच्या दरात सुमारे 27 हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. सध्या जळगावमध्ये सोन्याचा दर 1 लाख 46 हजार 600 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे, तर चांदीचा दर 2 लाख 32 हजार रुपये प्रति किलोवर आला आहे.

दरातील या मोठ्या घसरणीमुळे जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात ज्वेलर्सच्या दुकानांकडे वळत आहेत.

दर घसरल्यामुळे अनेक ग्राहकांनी खरेदीला प्राधान्य दिलं असून, बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. व्यापाऱ्यांनाही या वाढत्या मागणीमुळे चांगलीच चलती मिळत आहे.

गुढीपाडवा हा सण नव्या खरेदीसाठी शुभ मानला जातो. यंदा दरातील मोठी घसरण आणि सणाचा मुहूर्त एकाच वेळी आल्याने ग्राहकांसाठी हा दिवस खऱ्या अर्थाने ‘सोनेरी’ ठरल्याचं चित्र जळगावमध्ये पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---