महाराष्ट्रात ‘300 कि.मी. धावणार 300 वाहने’ ; जळगाव जिल्ह्यातून सुरुवात
जळगाव : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, ‘अहिल्या संदेश यात्रा’ निघणार आहे. या यात्रेचा वैशिष्ट्यपूर्ण संगम 300 कि.मी. प्रवास, 300 चारचाकी वाहने, आणि त्रिशताब्दी वर्ष–या त्रिवेणी संगमाचा अनोखा विक्रम ठरणार आहे. ही भव्य यात्रा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी( 30 मे ) सकाळी 7 वाजता जळगाव येथून निघणार आहे. ही संदेश यात्रा जामनेर येथे पोहचल्यावर ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथाचे पूजन होऊन रॅली मार्गस्थ होईल. ही रॅली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करत राजमाता अहिल्यादेवींच्या विचारांचा, संस्कृतीचा आणि पराक्रमाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवेल. अहिल्यादेवी जागर यात्रे संदर्भात भाजपा जिल्हा कार्यलयात घेण्यात आली.
एक मूल्यप्रवाहित चळवळ उभी करण्याचा या यातत्रेचा प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. आधुनिक भारताच्या विकासाला प्रेरणा देणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागर, स्वराज्य आणि नीतिनियमाधारित प्रशासनाची प्रेरणा, हे सारे या यात्रेच्या माध्यमातून जनमानसात पुनरुज्जीवित होणार आहे.
या ऐतिहासिक रॅलीच्या नियोजनासाठी भाजपाचे तिन्ही जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनवणे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली. या बैठकीत रॅलीचा संपूर्ण प्रवासमार्ग, नागरिकांचा सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सहभाग आदींबाबत रणनीती आखण्यात आली.
या रॅलीचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरतकी मर्यादित असणार नाही तिचा परिणाम राष्ट्रीय व जागतिक पातळीवर जाणवेल. अहिल्यादेवींच्या कार्याला आधुनिक संदर्भात जोडणारा हा उपक्रम युनेस्को, महिला आयोग, सांस्कृतिक परिषदा आणि ग्लोबल पीस मिशन यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनही निश्चितच दखल घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या अहिल्यादेवी जागर यात्रेच्या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष (पूर्व विभाग )चंद्रकांत बाविस्कर, भाजपा जिल्हाध्यक्ष(पश्चिम विभाग) डॉ. राधेश्याम चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष जळगाव महानगर दिपक सूर्यवंशी, भाजपा महानगर सरचिटणीस तथा दुध संघांचे संचालक अरविंद देशमुख, धनगर समाज महासंघाचे महामंत्री सुभाष सोनवणे, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे, धनगर समाज मल्हार सेनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. संजय पाटील, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण ठाकरे, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, उपाध्यक्ष तुळशीराम सोनवणे, दिलीप नाझरकर, कुणाल सुलताने, दिलीप कवडे, संतोष कचरे, भाजपा मंडळ अध्यक्ष जामनेर रवींद्र झाल्टे, मयूर पाटील, भाजपा जामनेर सरचिटणीस कैलास पालवे, भाजपा जामनेर शहर चिटणीस आदी उपस्थित होते.