महाराष्ट्रात दुहेरी संकट; पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा

---Advertisement---

 

मुंबई : महाराष्ट्र राज्यात हवामानाचा कडेलोट सुरू असून उष्णतेनंतर आता अवकाळी पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेचा कडाका वाढला होता. अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर बहुतांश जिल्ह्यांत 40 अंशांच्या पुढे नोंद झाली. या उकाड्यानंतर आता अचानक हवामान बदलत असून पावसाचे ढग दाटून आले आहेत.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. तसेच कोकण, मराठवाडा आणि किनारपट्टी भागांतही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान बिघडण्याची शक्यता अधिक आहे.गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हातात आलेली पिकेही उद्ध्वस्त झाली. आता पुन्हा गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यासह काही भागांत रात्री मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. पुढील दोन दिवसांतही अशाच हवामानाची शक्यता असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---