चोपड्यात हिंदू संघटनांचा भव्य मोर्चा; पोलीस निरीक्षक साळवे यांच्यावर कारवाईसाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम

---Advertisement---

 

चोपडा शहरात पोलीस प्रशासनाविरोधात मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी समस्त गोरक्षक आणि सकल हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात महिलांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

चोपडा शहरातील श्रीराम मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली असून मेन रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चाचे समापन करण्यात आले. यावेळी रोहित निकम, गजेंद्र जयस्वाल आणि संजय शर्मा यांनी उपस्थितांना संबोधित केले. के.जी.एन. कॉलनी परिसरातील कथित कत्तलखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची तसेच गोरक्षकांवरील हल्ले थांबवण्याची मागणी केली. यासोबतच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना त्वरित निलंबित करण्याची मागणीही जोर धरत होती.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करून पाच दिवसांत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

चोपडा शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलनही केले. अखेर वरिष्ठांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. तसेच तहसीलदार आणि पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना निवेदन देण्यात आले. या घटनेमुळे चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---