महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि सीआयआय यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार…रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार…!

---Advertisement---

 

महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आज मंत्रालयात माझ्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) यांच्यात एक महत्त्वाचा सामंजस्य करार संपन्न झाला.

जर्मनी, जपान आणि रशिया यांसारख्या विकसित देशांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी असून, ती पूर्ण करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यासोबतच त्या त्या देशांची भाषा आणि संस्कृतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून या करारांतर्गत विद्यार्थ्यांना ३ ते ६ महिन्यांचे तांत्रिक प्रशिक्षण आणि विदेशी भाषा प्रशिक्षणासोबतच सॉफ्ट स्किल्स व आंतरराष्ट्रीय कार्यसंस्कृतीचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात पहिल्या टप्प्यात ५०० ते १,००० विद्यार्थ्यांपासून करण्यात येणार असून, पुढील पाच वर्षांत दरवर्षी १०,००० विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांसाठी सज्ज करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या पंखांना आता जागतिक क्षितिजावर झेप घेण्याचे बळ मिळणार आहे.

या करारावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ प्रमोद नाईक, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत एन , सीआयआयचे राज्य प्रमुख पुष्कर हाथे, सीआयआय आंतरराष्ट्रीय भाषा विभागाचे प्रमुख नवोनील डी, दयाल कांगणे, उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---