धुळ्याहून भुसावळ जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

---Advertisement---

 

धुळेहून भुसावळकडे निघालेल्या एसटी बसला मार्गात गंभीर अपघाताचा सामना करावा लागला. बस अचानक चालकाच्या ताब्याबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि बसमध्ये आरडाओरडा सुरू झाला. सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चालक बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता.

एरंडोलजवळील धारागीर गावाच्या आधीपासूनच बसच्या मागील बाजूस काहीतरी बिघाड झाल्याचे संकेत मिळत होते. खळखळ असा आवाज येत होता. काही वेळातच ब्रेक निकामी झाल्याने बस पूर्णपणे अनियंत्रित झाली. ती कधी रस्त्यावरून घसरत होती, तर कधी रस्त्याच्या कडेला झुकत होती, त्यामुळे प्रवाशांची भीती आणखी वाढली.

या अपघातात अंदाजे १० ते १५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक आणि वाहक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी तातडीने धुळे येथे हलवण्यात आले. अपघातादरम्यान बसची काही चाकेही निखळल्याची माहिती समोर येत आहे.

सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, या अपघाताबाबत एसटी महामंडळाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---