भडगावजवळ भीषण अपघात! कार-बाईकची समोरासमोर धडक; बाईक पेटून खाक, तरुण गंभीर जखमी…!

---Advertisement---

 

भडगाव तालुक्यातील कजगाव शिवारात कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात मोटरसायकलस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून मोटरसायकलला लागलेल्या आगीमुळे ती पूर्णतः जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील चार जण कारने कासोदा येथे लग्नसमारंभासाठी जात होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी त्यांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलने तत्काळ पेट घेतला.

काही क्षणांतच मोटरसायकल आगीत भस्मसात झाली. अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.

अपघातानंतर मोटरसायकलला लागलेल्या आगीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी चाळीसगाव येथे हलवण्यात आले.

यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---