भारतासाठी दिलासादायक बातमी! सर्वाधिक तेलसाठा असलेला देश मदतीला; इंधन दर स्थिर होण्याची शक्यता

---Advertisement---

 

इराण-अमेरिका संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असताना आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक संकटात सापडल्याने जगभरात इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण अमेरिकेतील तेलसमृद्ध देश वेनेझुला भारतासाठी मोठा आधार बनून पुढे आला आहे. भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या देशांच्या यादीत आता व्हेनेझुएलाने तिसरे स्थान मिळवले असून, त्याने सौदी अरेबीया आणि युनाइटेड स्टेट्स सारख्या देशांनाही मागे टाकले आहे.


303 अब्ज बॅरल तेलसाठ्यामुळे व्हेनेझुएला पुन्हा चर्चेत
जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचा साठा व्हेनेझुएलाकडे असल्याचे मानले जाते. या देशाकडे तब्बल 303 अब्ज बॅरल तेलसाठा असून, तो जगातील एकूण तेलसाठ्याच्या सुमारे 20 टक्के आहे. अनेक वर्षे खराब व्यवस्थापन, आर्थिक संकट आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे हा प्रचंड साठा वापरात येत नव्हता. 2020 मध्ये उत्पादन 4 लाख बॅरल प्रतिदिनापर्यंत घसरले होते.
मात्र आता परिस्थिती बदलत असल्याचे दिसत आहे. ओपेकच्या मे 2026 च्या अहवालानुसार, अमेरिकेकडून काही निर्बंधांमध्ये सूट मिळाल्यानंतर आणि चेवरोन सारख्या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे व्हेनेझुएलाचे तेल उत्पादन 11.36 लाख बॅरल प्रतिदिनपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील पेट्रोल-डिझेल दर स्थिर राहण्याची आशा व्यक्त होत आहे.


मध्यपूर्वेतील तणावामुळे भारताने बदलली रणनीती
इराण संघर्षामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील जहाज वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, सौदी अरेबियाकडून होणारा पुरवठा घटल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिफायनरी कंपन्यांनी वेगाने व्हेनेझुएलाकडे मोर्चा वळवला आहे.
मे महिन्यात भारताने व्हेनेझुएलाकडून सुमारे 4.17 लाख बॅरल प्रतिदिन कच्चे तेल खरेदी केले. हा व्हेनेझुएलाच्या एकूण निर्यातीपैकी 55 टक्क्यांहून अधिक हिस्सा असल्याचे सांगितले जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रिस आणि नायरा एनर्जी सारख्या भारतीय कंपन्या व्हेनेझुएलाच्या जड क्रूड तेलावर प्रक्रिया करण्यात आघाडीवर आहेत.


ओएनजीसीच्या गुंतवणुकीलाही मिळणार फायदा

भारताची सरकारी कंपनी ONGC विदेश ने व्हेनेझुएलातील तेल प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांतील अस्थिरतेमुळे हा पैसा अडकला होता. मात्र आता परिस्थिती सुधारत असल्याने भारताच्या गुंतवणुकीला सुरक्षा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


भारताचा स्पष्ट संदेश – एका देशावर अवलंबून राहणार नाही
भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे ऊर्जा सुरक्षेसाठी भारत आता विविध देशांकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणावर भर देत आहे. मे महिन्यात भारताची एकूण तेल आयात 8 टक्क्यांनी वाढून 49 लाख बॅरल प्रतिदिन झाली आहे. रशियानंतर आता व्हेनेझुएला भारतासाठी महत्त्वाचा तेल पुरवठादार बनत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---