लोहारी शिवारात रानडुक्कराचा हल्ला; एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; वनविभागाप्रति संताप…

---Advertisement---

 

लोहारी शिवारातील केळी बागेच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांवर रानडुक्कराने हल्ला चढवल्याची घटना घडली असून या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील लोहारी शिवारात केळी बागेच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांवर सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास अचानक रानडुक्कर ने हल्ला चढवला या हल्ल्यात राजेंद्र श्रावण कुमावत (वय- 55), आशाबाई राजेंद्र कुमावत (वय-50), किशोर राजेंद्र कुमावत (वय-35), सपना राजेंद्र कुमावत (वय-30) तसेच रुचिता किशोर कुमावत (वय अंदाजे 10 वर्ष) हे जखमी झाले असून जखमींना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी शहरातील संजीवनी हॉस्पिटल मध्ये  दाखल करण्यात आले आहे या ठिकाणी जखमींवर उपचार सुरु आहे.

सदर घटनेबाबत प्रवीण पाटील यांनी सांगितले की, वनविभागास सदर घटनेची माहिती देण्यात आली असून ऑनलाईन तक्रार ही देण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जण जखमी असतांना वनविभागाचे अधिकारी यांनी भेट दिली नसून जखमींची विचारपूस देखील करण्यात आली नसल्याने वनविभागाप्रती संताप व्यक्त करण्यात येत आहे.लोहारी शिवारात  रानडुक्करांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून वनविभागातर्फे अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---