जळगावात गॅस टंचाईचा फटका; LPG पंपावर ऑटो रिक्षा आणि वाहनांची मोठी गर्दी, चालक संतप्त….!

---Advertisement---

 

जळगाव शहरात एलपीजी गॅसच्या तुटवड्याचे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. शहरातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ही रांग तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत गेल्याचे दिसून आले.

जळगाव शहरात सध्या केवळ एकच एलपीजी गॅस पंप सुरू असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे. गॅसचा तुटवडा आणि वाढते दर यामुळे ऑटो रिक्षा चालक आणि वाहनचालक मोठ्या संख्येने गॅस भरण्यासाठी पंपावर दाखल होत आहेत.

गॅस भरण्यासाठी चालकांना तीन ते चार तासांपर्यंत रांगेत थांबावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

---Advertisement---

 

दरम्यान, एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---