पाचोऱ्यात अवैध धंद्यांविरोधात उपोषण; पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

---Advertisement---

 

पाचोरा प्रतिनिधी : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करावी तसेच संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली करावी, या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी १४ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

उपोषण दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत पिंपळगाव (हरेश्वर) परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेत उपोषणाची सांगता केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---