जळगावात घरफोडी करणारे अट्टल चोरटे मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात….!

---Advertisement---

 

जळगाव शहरातील अयोध्या नगर भागातील बंद घरात घरफोडी झाली होती. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीत चोरी झालेला संपुर्ण मुद्देमाल 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलीस पथकाने जप्त केले आहेत. यासह गुन्ह्यात चोरट्यांनी वापरलेले सुमारे चार लाख किमतीचे चारचाकी वाहन व वाहनात मिळुन आलेले लोखंडी पकड (पेंचिस), स्क्रू ड्रॉयव्हर, एक लहान चाकु असा मुद्देमाल देखील तपासकामी जप्त करण्यात आला आहे. अटकेतील दोघांनी एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केलं आहे.

जळगाव शहरातील अयोध्या नगरातील या घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघे आंतरराज्य चोरटे त्यांनी चोरी केलेल्या मुद्देमालासह अटक करण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोघा अट्टल चोरट्यांना मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यातून अटक केलं आहे. यात सुखदेव रामसिंग टाक व आकाश दिनेश वाघे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील  फौजदार राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आदींच्या पथकाला घरफोडीच्या या गुन्ह्याच्या तपाससाठी योग्य त्या सुचना देऊन पुढील कारवाईकरीता कार्यरत केले होते. या गुन्ह्यात चोरी झालेला संपुर्ण मुद्देमाल 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पथकाने जप्त केला आहे. अटकेतील दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---