न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती, मुंबईतील भेटीनंतर महापौरांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक

---Advertisement---

 

जळगाव : महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतल्यानंतर गुरुवारी जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी आणि प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक विषयांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनांवर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तसेच सदर न्यायालयीन प्रकरणाची सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितली होती. त्यानुसार गुरुवारी महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक अरविंद देशमुख, अॅड. शुचिता हाडा, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विजयकुमार सोनवणे, सहाय्यक नगर रचनाकार अमोल पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले, विधी शाखेचे अधिकारी गौरव सपकाळे आणि ॲड. आनंद मुजुमदार आदी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे चर्चेचे मुद्दे

महानगरपालिकेचे विविध न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा महापालिकेच्या कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेता, त्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्याबाबत चर्चा झाली. अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून महापालिकेला येणे असलेल्या मोठ्या रकमेच्या वसुलीबाबत बैठकीत सविस्तर खल झाला. ही वसुली कशा प्रकारे पदरात पाडून घेता येईल, याचे नियोजन करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---