जळगाव : शहरात सलग दोन दुर्दैवी अपघातांच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. १८ डिसेंबर रोजी रात्री अजिंठा चौकात भरधाव ट्रकने एका व्यक्तीला चिरडले. ही घटना ताजी असतानाच २४ तासात म्हणजेच गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दुसरा एक अपघात घडला आहे. भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या भरधाव आयशरने कृषी उत्पन्न समितीजवळ पायी चाललेल्या अजय कोळी याला जोरदार धडक दिली. या अपघातात अजय कोळी यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अजिंठा चौकात १९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे आयशर भरधाव येत होती. या गाडीने पायी जाणाऱ्या अजय कोळीला जोरदार धडक दिली. या घटनेत अजय सिताराम कोळी रा. पिंप्री जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयताच्या खिशातील कागदपत्रामुळे त्यांची ओळख पटली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.