जळगाव पोलिसांचा वाहतूक नियमांच्या उल्लंघनाविरुद्ध ‘धडाका’; ५ तासांत २१०० वाहनांवर कारवाई

---Advertisement---

 

शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमभंग रोखण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम राबवत कडक कारवाई सुरू केली आहे. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल २१०० हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून २.४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर ही मोहीम राबविण्यात आली. यात उपविभागीय अधिकारी, पोलिस अधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.


सुमारे २१०० ते २३०० वाहनांची तपासणी
मोटार वाहन कायद्यांतर्गत ३७६ प्रकरणे नोंद
२,४८,६५० रुपयांचा दंड वसूल
नियमभंग करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई
दुचाकी ट्रिपल सीट व हेल्मेट नसणे यावर विशेष लक्ष
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई
उद्धट व बेदरकार वाहनचालकांवर गुन्हे दाखल

शहरातील एमआयडीसी, शनीपेठ, जिल्हापेठ, रामानंद नगर, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा आदी भागात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---