पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर अमेरिकेचा मोठा निर्णय; इराणसोबतची युद्धबंदी वाढवली

---Advertisement---

 

वॉशिंग्टन/तेहरान (प्रतिनिधी):
जागतिक राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेली युद्धबंदी (सीझफायर) काही काळासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान च्या विनंतीनंतर अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मात्र, ही युद्धबंदी किती कालावधीसाठी असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेला इराणवरील संभाव्य हल्ले काही काळासाठी थांबवण्याची विनंती केली होती. इराणला शांततेसाठी ठोस प्रस्ताव तयार करण्याची संधी द्यावी, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली होती. ही विनंती मान्य करत ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला सध्या हल्ले टाळण्याचे आदेश दिले.
दरम्यान, इराणमधील अंतर्गत परिस्थितीवर भाष्य करताना ट्रम्प यांनी “इराणमध्ये नेतृत्वात एकजूट नसल्यामुळे निर्णय प्रक्रियेला वेळ लागत आहे,” असे नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, जोपर्यंत इराणकडून ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत परिस्थिती अशीच राहू शकते.


युद्धबंदी वाढवली असली तरी अमेरिका ने आपला दबाव कायम ठेवला आहे. इराणवर ‘नाकेबंदी’ सुरूच ठेवण्यात येणार असून अमेरिकन सैन्य हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. शांतता करार न झाल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी यूके आणि फ्रान्सकडून ३० देशांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांचा पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आला आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांनी युद्धबंदी कमकुवत असल्याचा दावा करत पुढील संघर्षाचा इशारा दिला आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदीबाबत अमेरिकेच्या भूमिकेवर टीका केली आहे.


एकूणच, पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे तात्पुरती दिलासा मिळाला असला तरी इराणच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पुढील काळात शांतता प्रस्थापित होते की संघर्ष वाढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---