---Advertisement---
जळगाव शहरात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सराफा बाजारात मोठी खरेदीची लगबग पाहायला मिळाली. वाढत्या दरांनाही न जुमानता ग्राहकांनी सोने व चांदी खरेदीसाठी मोठी गर्दी केली.
यंदा जळगाव शहरात सुमारे 45 कोटी रुपयांची उलाढाल झाली असून संपूर्ण जिल्ह्यात ही आकडेवारी 75 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 57 हजार रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरातही सुमारे 1 लाख 63 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. तरीदेखील अक्षय तृतीया या सणाच्या पारंपरिक महत्त्वामुळे खरेदीवर त्याचा परिणाम झालेला दिसून आला नाही.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सराफा बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.
व्यापाऱ्यांच्या मते, दरवाढ असूनही मागणीत घट न दिसता उलट खरेदीत वाढ झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.









