जळगावात खाजगी वाहनावर अशोक स्तंभाचा गैरवापर; कार मालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

 

जळगावात खासगी वाहनावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ लावल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नयना चौधरी यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.

ही घटना १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उघडकीस आली. संबंधित चारचाकी वाहनावर ‘स्वामी ग्रुप अँड इन्फ्रास्ट्रक्टर प्रोप्रायटर’ असा स्टीकर लावण्यात आला होता. या स्टीकरच्या मध्यभागी भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ दिसून आला.

या प्रकरणाची तक्रार जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या अधिकृत ई-मेलवर करण्यात आली होती. तक्रारीत खासगी व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिकांना त्यांच्या खासगी वाहनावर अशोक स्तंभासारख्या राष्ट्रीय चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार नसल्याचे नमूद करण्यात आले होते.

त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यावरून नयना चौधरी यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---