जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; नवीन अमृत भारत एक्सप्रेस सेवेत दाखल होणार…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्हयातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जळगाव आणि भुसावळ मार्गे आणखी एक नवीन अमृत भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून रेल्वे मंत्रालयाकडून हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. पनवेल- अलीपुरद्वार दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस गाडी क्र. 11031 डाऊन तर अलीपुरद्वार- पनवेल गाडी क्र. 11032 अप मार्गावर अमृत भारत रेल्वे गाडी सुरु करण्यात आली आहे. या गाडीला जळगाव-भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान डाऊन मार्गावरील गाडी क्रमांक 11031 पनवेल जंक्शन-अलीपुरद्वार जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी 11:50 मिनिटांनी पनवेल जंक्शनवरून सुटेल आणि बुधवारी दुपारी 01:50 मिनिटांनी वाजता अलीपुरद्वार जंक्शन स्टेशनवर पोहोचेल. आणि अप मार्गावरील गाडी क्रमांक 11032 अलीपुरद्वार जंक्शन- पनवेल जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर गुरुवारी पहाटे 04:45 वाजता अलीपुरद्वार जंक्शनवरून सुटेल आणि शनिवारी पहाटे 05:30 वाजता पनवेल जंक्शन स्टेशनवर पोहोचेल.

दोन्ही मार्गावरील या स्थानकांवर रेल्वे गाडीला थांबा ?

कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, कटिहार, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर अप व डाऊन मार्गावर ही एक्सप्रेस थांबणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---