---Advertisement---
नाशिक विभागासह अमळनेर तालुक्यात बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अमळनेर तालुक्यातल्या विविध शाळा आणि संस्थांमधील सुमारे 100 जणांना चौकशी कामे नोटीसा बजावण्यात आल्या असून नाशिक विभागातील एकूण 892 शालेय कर्मचारी हे सध्या चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
शालार्थ आयडी घोटाळ्याची गांभीर्यता लक्षात घेत शिक्षण विभागाने उच्चस्तरीय समिती ही गठीत केली असून या समितीमध्ये नवी मुंबई वाशी येथील विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, कोल्हापूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, लातूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांच्यासह शिक्षण परिषदेचे सहसंचालक देविदास कुलाळ आणि पुणे शिक्षण मंडळाचे औदुंबर उकिरडे यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या या उच्चस्तरीय समितीमार्फत सखल चौकशीही केली जात असून संबंधितांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे
गेल्या मंगळवारी 17 आणि बुधवारी जवळपास 79 शिक्षकांना व संस्थांना चौकशीसाठी नोटिसा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आणि नोटिसा मिळाल्यानंतर काही शाळांतील मुख्याध्यापकांनी अचानक रजा घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र काही जणांनी आवश्यक ते कागदपत्र सादर करण्याची सुरुवात केली आहे.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे हे अनेक शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचले असून काही संस्था या राजकीय व्यक्तींशी संबंधित आहेत. त्यामुळे घोटाळ्याचा तपास कोणत्या स्तरावर पोहोचतो आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारचे घोटाळे करणाऱ्यांवर कठोरात कठोर अपेक्ष कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रावर पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह हे निर्माण झाला आहे.









