पाचोरा परिसरात गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांची धाड; दारूचे रसायन नष्ट…!

---Advertisement---

 

पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील वाघूलखेडा व तारखेडा शिवारात गैरकायदा चालू असलेल्या गावठी दारू च्या भट्ट्यावर पाचोरा पोलिसांनी धाडी टाकून 39 हजार रुपये किमतीचे दारूचे रसायन नष्ट करण्यात आले असून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईने तालुक्यातील गावठी दारू पाडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर यांनी दारुबंदी कायद्याखाली जास्तित जास्त प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना दिल्याने त्यानुसार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे पाचोरा पोलीस निरीक्षक यांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, अशोक हटकर, पो.काँ योगेश पाटील यांचे पथक तयार करुन मिळालेल्या बातमीनुसार, रवाना करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा शिवारात हिवरानदीपात्रात अचानक धाड टाकली असता याकुब गनी हुसैन रिचवाले (वय- 42, रा. सिंधी ता. भुसावळ ह.मु. वाघुलखेडा ता. पाचोरा) हा भट्टी लावून एकुण 16000/- रु किंचे 150 लिटर गुळ, मोह, मिश्रित कच्चे पक्के रसायन व 10 लि.गाहभची तयार दारु गाळतानां व कब्जात बाळगतानां मिळुन आल्याने मुद्देमाल जागेवर नष्ट करण्यात आला असून आरोपी विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला महा. दारुबंदी अधि. कलम नुसार दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पाचोरा तालुक्यातील तारखेडा शिवारात पोलीस पथकाने धाड टाकली असता धरणाचे खाली ईसम नामे भगवान रघुनाथ भिल (रा. तारखेडा ता.पाचोरा) खाली भट्टी लावून एकुण 23000/- रु कि.चे 200 लिटर गुळ, मोह, मिश्रित कच्चे पक्के रसायन व 30 लि. गाहभ ची तयार दारु गाळतानां व कब्जात बाळगतानां मिळुन आल्याने सदरील मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून आरोपी विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला महा. दारुबंदी अधि. कलम नुसार दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील दाखल दोन्ही गुन्हयाचे तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे व अशोक हटकर हे करित आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---