शिरसोलीत भिल्ल समाजाची हक्कांसाठी लढाई; प्रशासनाला अल्टिमेटम

---Advertisement---

 

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. नं. गावात आदिवासी भिल्ल समाजाच्या हक्कांसाठी मोठी हालचाल सुरू झाली आहे. लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने ग्रामपंचायत शिरसोली येथे आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबांच्या वतीने महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित कुटुंबे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर वास्तव्यास असून, शासनाच्या २०११ च्या निर्णयानुसार ज्या जागेवर ते राहतात, ती जागा त्यांच्या नावे नियमित करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीमुळे स्थानिक पातळीवर प्रश्नाला गांभीर्य प्राप्त झाले आहे.


निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, मागणीवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येईल.
सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले असून, प्रशासन पुढे काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---