---Advertisement---

रामलला प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

by team
---Advertisement---

इंदूर : रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ‘प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरी केली जावी; कारण हे मंदिर अनेक शतकांपासून शत्रूच्या हल्ल्याचा सामना करीत होते आणि भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना या दिवशी झाली.

राममंदिर आंदोलन कोणाचाही विरोध करण्यासाठी सुरू झाले नसल्याचेही त्यांनी म्हटले. इंदूर येथील एका कार्यक्रमात श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना ‘राष्ट्रीय देवी अहल्या पुरस्कार’ प्रदान केल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत बोलत होते. ते म्हणाले, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठेचा पौष शुक्ल द्वादशी हा दिवस ‘प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरा केला पाहिजे. शतकानुशतके बाह्य आक्रमणे सहन करणाऱ्या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली.

देश स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि जगाला मार्ग दाखवता यावा, यासाठी भारताने स्वतःला जागृत करण्यासाठी राम मंदिर आंदोलन सुरू केले होते. गेल्या वर्षी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी देशात कोणताही वाद झाला नाही, अशी आठवणही सरसंघचालकांनी करून दिली. पुरस्कार स्वीकारत्यानंतर राय यांनी हा पुरस्कार राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना समर्पित केला. हा पुरस्कार मी राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या ज्ञात-अज्ञात लोकांना समर्पित करतो, ज्यांनी अयोध्येत हे मंदिर बांधण्यात मदत केली. अयोध्येत बांधलेले हे मंदिर हिंदुस्थानच्या अभिमानाचे प्रतीक आहे आणि तेच या मंदिराच्या उभारणीचे कारण आहे, असे चंपत राय यांनी म्हटले.

देवी अहल्या राष्ट्रीय पुरस्कार हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो श्री अहल्योत्सव समिती या इंदूर येथील सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन या संघटनेच्या अध्यक्ष आहेत. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये नानाजी देशमुख, विजयाराजे शिंदे, रघुनाथ अनंत माशेलकर आणि सुधा मूर्ती या दिग्गजांचा समावेश आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment