उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित ‘प्रहार’चा दमदार टीझर प्रदर्शित; अभिनेता राजकुमार राव निकमांच्या भूमिकेत….!

---Advertisement---

 

प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, अभिनेता राजकुमार रावच्या प्रभावी अभिनयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “जेव्हा न्यायाला एका आवाजाची गरज होती, तेव्हा एक माणूस त्याचा प्रहार बनला,” अशा आशयाच्या कॅप्शनसह हा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

या चित्रपटात राजकुमार राव यांनी उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली असून, त्यांच्या लूकपासून ते देहबोलीपर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे टीझरमधून दिसून येते. विशेषतः न्यायालयीन दृश्यांमधील त्यांचा अभिनय आणि संवादफेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

टीझरमध्ये 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित काही महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. “याला मारू नका, हा एव्हिडन्स आहे…” हा संवाद विशेष चर्चेत आला असून, त्यातून संपूर्ण कथानकाची उत्सुकता वाढली आहे. पार्श्वसंगीत, गंभीर वातावरण आणि न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी चित्रण यामुळे टीझरला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

उज्ज्वल निकम यांनी अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. विशेषतः 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटातील राजकुमार राव यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता आलेल्या टीझरमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा आणि दहशतवादाविरोधातील लढा यांचा संगम असलेला हा चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---