---Advertisement---
जागतिक घडामोडींमुळे इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या खर्चाचा सामना करणाऱ्या रिक्षाचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यातच ऑटो एलपीजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली असून प्रति लिटर दर १२५ रुपयांवरून ९६ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. मध्यपूर्वेतील तणाव आणि पुरवठ्याबाबतच्या चिंतेमुळे पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजीच्या दरांवर परिणाम झाला होता. परिणामी वाहतूक क्षेत्रातील खर्च वाढल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालकांनाही आर्थिक फटका बसला होता.
मात्र, अलीकडील काळात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये काहीशी नरमाई दिसून येत आहे. त्याचा परिणाम ऑटो एलपीजीच्या दरांवरही झाला असून दरात लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे.
एलपीजी दरकपात हि काही शहरामध्ये लागू झाली असून यामुळे रिक्षाचालकांच्या दैनंदिन इंधन खर्चात बचत होणार असून त्याचा अप्रत्यक्ष फायदा प्रवाशांनाही मिळू शकतो. दरम्यान, काही शहरातील एलपीजी पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे.
ही दरकपात वाहतूक क्षेत्रातील वाढत्या खर्चामुळे चिंतेत असलेल्या वाहनचालकांसाठी दिलासादायक ठरत असून आगामी काळात बाजारातील परिस्थितीनुसार दरांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









