---Advertisement---
मुंबई : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातून प्राप्तत झालेल्या सकारात्मक संकेतांमुळे, कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी वाढल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.
दिवसभराच्या व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स 395 अंकांनी वाढून 73,918.76 वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 119 अंकांच्या वाढीसह 23,242.10 या पातळीवर स्थिरावला.विशेषतः बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांनी बाजाराच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली.
जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचा देखील भारतीय शेअर बाजाराला फायदा झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असून आगामी सत्रांमध्येही बाजाराच्या हालचालींवर जागतिक घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किंमतींचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
Strait of Hormuz वर वाढता तणाव आणि अमेरिका – इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होते हे महत्वाचे असेल.









