राज्यात ऊन-पावसाचा खेळ; २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळी वारे, गारपीटीचा इशारा

---Advertisement---

 

राज्यात सध्या ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असून हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. विदर्भात कडक उन्हाचा तडाखा जाणवत असताना खान्देश व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) २० ते २४ एप्रिलदरम्यान राज्यातील विविध भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाचा इशारा दिला आहे.
IMD च्या पाच दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान अचानक बदलण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानेही यासंदर्भात खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत.


नागरिकांनी घ्यावी खबरदारी

वादळी वारे व विजांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात किंवा पाण्याजवळ उभे राहणे टाळावे. विजांचा कडकडाट सुरू असताना मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


प्रशासन सतर्क
ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांना तातडीने जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा व सार्वजनिक इमारती तात्पुरत्या निवाऱ्यासाठी खुल्या ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.


शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

शेतकऱ्यांनी वादळी हवामानाच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत. बांधकाम कामे तात्पुरती थांबवावीत. तसेच मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचना व हवामान खात्याच्या इशाऱ्यांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---