संत मुक्ताबाईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंग पालखीचे मुक्ताईनगर मध्ये आगमन….!

---Advertisement---

 

टाळ, मृदंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या ७२९ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरी निवासी श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याने श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे रविवारी दि. १० रोजी मुक्ताईनगर कडे प्रस्थान केले होते. सकाळी ६ वाजता श्री पांडूरंगराय पादुकांची विधिवत पूजा व आरती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त ज्ञानेश्वरजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, व्यवस्थापक रवींद्र महाराज हरणे, विश्वस्त संदीप पाटील, विश्वस्त सम्म्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे, माऊली सम्राट पाटील, प्रतिभा पाटील, श्रद्धा पाटील यांच्यासह विठ्ठलभक्त उपस्थित होते. ही पालखी रविवारी दि. १० रोजी करमाळा, अहिल्या नगर मार्गे ११ रोजी भुसावळात मुक्काम करून मंगळवारी दि.१२ रोजी सकाळी श्री संत मुक्ताबाई संस्थान निवृत्ती महाराज पादुका व श्री विठ्ठल पादुका श्री नामदेव महाराज पादुकांचे आगमन झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---