---Advertisement---
जळगावच्या बोदवड शहरातील रेणुका माता मंदिर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच पुत्ररत्न प्राप्त झालेल्या बाळंतिणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने आनंदात न्हालेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जितेंद्र रतनलाल शर्मा यांच्या पत्नी खुशबू जितेंद्र शर्मा (वय २७) यांनी दोन दिवसांपूर्वी गोंडस मुलाला जन्म दिला होता. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र सोमवारी सकाळी खुशबू यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी कुटुंबीय रुग्णालयात खुशबू आणि नवजात बाळाला भेटण्यासाठी गेले असता अचानक त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. क्षणात सगळं काही बदलून गेले, आनंदाच्या शोककळा पसरली. आनंदाच्या जागी शोककळा पसरली, आणि घटनेने परिसर हळहळला.
आईच्या कुशीची ऊब अजून नीट अनुभवायलाही न मिळालेलं दोन दिवसांचं बाळ रडत होतं, तर चार वर्षाची लहानगी मुलगीही आईच्या विरहाने हंबरडा फोडत होती. एका क्षणात संसाराचा आधार निघून गेल्याने संपूर्ण कुटुंब शोकमग्न झाले आहे.









