लग्नसराईने फुलांचा भाव खुलला; मोगऱ्याला तब्बल ३ हजार रुपये किलो भाव…!

---Advertisement---

 

जळगाव- लग्नसराई आणि सण- उत्सर्वाच्या पार्श्वभूमीवर फुले आणि पुष्पहारांना सध्या मागणी वाढली आहे. अशात मात्र उन्हाळ्यामुळे उत्पादन घटल्याने आवकही मर्यादित आहे. एकीकडे आवक घटली असताना मागणी वाढल्याने फुलांच्या दराने उसळी घेतली आहे. सर्वच फुलांचे दर वाढले असून मोगरा तर चक्क २ ते ३ हजार रुपये किलो दरापर्यंत पोहोचला आहे.

अशा स्थितीतही विवाह सोहळे शाही करण्याकडे वधू-वरांचा कल दिसून येत आहे. बाजारपेठेत ‘डिझायनर वरमाला’ ची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. बॉलिवूड स्टाइल मिळवण्यासाठी तरुण मंडळी बेट कलाकारांच्या लग्नाचे फोटो दाखवून फुलांच्या ऑर्डर देत असल्याचे चित्र मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या पारंपरिक जाडजूड हारांची जागा आता नाजूक आणि सुबक अशा डिझायनर हारांनी घेतली आहे. प्रामुख्याने डच गुलाब व इतर सुशोभीत फुले वापर करून बनवलेल्या हारांना मोठी पसंती मिळत आहे.

फुलांचे दर वाढले आहेत. ग्राहक मात्र जास्त पैसे द्यायला तयार नसतात. यामुळे कमी नफ्यातही ऑर्डस घ्याव्या लागत असल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले. तसेच डेकोरेशनमध्ये फुलांचा आग्रह असल्याने लग्नाचे बजेट वाढले आहे. डिझायनर हार तसेच स्टेजची फुलांची सजावट यामुळे फुल सजावटीचे बजेट सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे फुल विक्रेत्यांना महागड्या ऑर्डर्स ही मिळू लागल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---