गोवंशाची अवैध वाहतूकीचे तीन मिनीट्रक पोलीसांच्या ताब्यात, चाळीसगाव धुळे मार्गावर प्रशासनाची कारवाई

---Advertisement---

 

Dhule News : कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची अवैध वाहतूक करणारे एकापाठोपाठ तीन मिनी ट्रक धुळे तालुका पोलिसांनी पकडले. धुळे-चाळीसगाव मार्गावरील चांदे (ता. धुळे) शिवारात शनिवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरा तिघा मिनीट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

चांदे शिवारात महामार्गावर धुळे तालुका पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. त्यात जनावरांची निर्दयतेने वाहतूक करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. दरम्यान एकापाठोपाठ तीन वाहने पोलिसांनी अडवून चौकशी केली. यात विना परवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आले असून कत्तलीच्या उद्देशाने अन्य जिल्ह्यात गोवंश नेत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

संशयित फिरोज आयुब खान (वय ५२, रा. पश्चिम हुडको, चाळीसगाव रोड धुळे) याच्याविरुद्ध हवालदार संदीप गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फिरोज आयुब खान याने मिनी ट्रक क्रमांक एम एच ०३, सीपी ०२६७ दोन लाखांचा व वीस हजाराचे दोन गोवंश जप्त करण्यात आले. अन्य संशयित शिवप्रसाद भिला पाटील (वय ५२, रा. कापडणे, ता. धुळे) याच्या विरुद्ध मिनी ट्रक क्रमांक एम एच ०१ बीआर ०२७६ एक लाखाचा व वीस हजाराचे दोन गोवंश जप्तीची कारवाई करण्यात आली.

हवालदार दीपक मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत मनोहर श्रीराम पाटील (वय ४०, रा. भडणे ता. शिंदखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याच्या मिनी ट्रक मधून वीस हजारांचे दोन गोवंश व मिनिट्रक जप्त करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---