केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान जळगाव दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांना देणार भेट

---Advertisement---

 

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे १९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अधिकृत कार्यक्रमाची माहिती जाहीर केली असून, या भेटीत ते शेतीसंदर्भातील विविध उपक्रमांचा आढावा घेणार आहेत.

नियोजित कार्यक्रमानुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजता ते दिल्लीहून विशेष विमानाने जळगावकडे प्रस्थान करतील आणि सकाळी सुमारे ९.३० वाजता जळगाव विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ११ वाजेपर्यंत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या प्रकल्पांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करतील.

दुपारी १ वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केळी उत्पादक भागधारकांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत केळी उत्पादक, व्यापारी आणि बाजार समित्यांचे प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद साधला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटकांना एकत्र आणणारा हा पहिलाच असा उपक्रम असल्याचे मानले जात आहे.

यानंतर दुपारी २.३० वाजता ते अमळनेर येथील मंगल ग्रह मंदिरात पोहोचतील, जिथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘भूमी सुपोषण अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दिवसअखेर संध्याकाळी ६.३० वाजता ते पुन्हा जळगाव विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील आणि रात्री ८.१५ वाजेपर्यंत राजधानीत पोहोचण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---