---Advertisement---
बारामती/राहुरी, दि. २३ एप्रिल — राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. बारामती मतदारसंघातील रिक्त जागेसाठी ही निवडणूक होत असून, ती प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे.
बारामतीत एकूण २३ उमेदवार रिंगणात असून, काही प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.
यामध्ये सुनेत्रा पवार , रघु गुंटुकडे , सतीश कदम , करुणा धनंजय मुंडे आणि अभिजित बिचुकळे यांच्याकडे विशेष लक्ष आहे.
काँग्रेसचे उमेदवार माघार घेतल्यानंतरही निवडणुकीत रंगत कायम आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक “बारामतीकरांच्या भावना व्यक्त करणारी” ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.
राहुरीत भाजप–राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमनेसामने
राहुरी मतदारसंघात एकूण ७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. येथे अक्षय कर्डीले (भाजप) आणि गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी – शरद पवार गट) यांच्यात थेट सामना रंगण्याची शक्यता आहे.
दोन्ही मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी उत्साहाने हजेरी लावली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान: २३ एप्रिल २०२६
निकाल: ४ मे २०२६
आता या दोन्ही मतदारसंघातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे राज्याचे लक्ष लागले असून, निकालाच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे.









