---Advertisement---
Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप, तप आणि पूजा “अक्षय” म्हणजेच कधीही न संपणारे फळ देतात, अशी श्रद्धा आहे. विशेष म्हणजे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात सुख, समृद्धी आणि धनवृद्धी होते. मात्र केवळ धनलाभासाठीच नव्हे, तर जीवनातील सर्वांगीण सुखासाठी “अष्टलक्ष्मी” पूजेचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. अष्टलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची आठ दिव्य स्वरूपे. ही आठ रूपे जीवनातील वेगवेगळ्या गरजा पूर्ण करणारी मानली जातात—धन, अन्न, ज्ञान, संतती, धैर्य, विजय अशा विविध क्षेत्रांत आशीर्वाद देणारी ही शक्ती आहेत.
अष्टलक्ष्मीची 8 स्वरूपे आणि त्यांचे महत्त्व:
१.आदिलक्ष्मी : हे लक्ष्मीमातेचे मूलभूत स्वरूप मानले जाते. आदिलक्ष्मीची पूजा केल्यास जीवनात शांती, धर्म, मोक्ष आणि स्थैर्य प्राप्त होते. आध्यात्मिक प्रगतीसाठी हे स्वरूप अत्यंत महत्त्वाचे आहे.
२.धनलक्ष्मी : धन, संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य देणारी देवी. व्यवसाय, नोकरी किंवा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी धनलक्ष्मीची पूजा केली जाते.
३.धान्यलक्ष्मी : अन्न, धान्य आणि पोषण यांचे प्रतीक. घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये म्हणून या देवीची आराधना केली जाते.
४.गजलक्ष्मी : हत्तींसह दर्शवले जाणारे हे स्वरूप वैभव, सत्ता आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांसाठीही गजलक्ष्मीची पूजा विशेष लाभदायक मानली जाते.
५.संतानलक्ष्मी : संततीसाठी आशीर्वाद देणारी देवी. निरोगी, गुणी आणि सुखी परिवारासाठी या स्वरूपाची पूजा केली जाते.
६.वीरलक्ष्मी : धैर्य, आत्मविश्वास आणि संकटांवर मात करण्याची शक्ती देणारी देवी. जीवनातील संघर्षांमध्ये यश मिळवण्यासाठी वीरलक्ष्मीची उपासना केली जाते.
७.विजयलक्ष्मी : यश आणि विजयाचे प्रतीक. कोर्ट-कचेरीचे प्रकरण, स्पर्धा किंवा करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या देवीची पूजा केली जाते.
८.विद्यालक्ष्मी : ज्ञान, बुद्धी आणि कौशल्य प्रदान करणारी देवी. विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी विशेष महत्त्वाची.
अक्षय तृतीयेला अष्टलक्ष्मी पूजा का करावी?
अक्षय तृतीया हा दिवस शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केल्यास अनेक फायदे होतात. यात,
१.धन आणि संपत्तीमध्ये वाढ होते
२.घरात सुख-शांती आणि समाधान येते
३.अन्न व संसाधनांची कमतरता राहत नाही
४.करिअर आणि व्यवसायात यश मिळते
५.ज्ञान, बुद्धी आणि निर्णयक्षमता वाढते
६.कुटुंबात आनंद आणि संततीसुख मिळते
दरम्यान अक्षय तृतीयेची सोपी पद्धत काय ?
१.सकाळी लवकर उठून स्नान करावे
२.घर स्वच्छ करून पूजा स्थळ सजवावे
३.अष्टलक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी
४.कमळफूल, तांदूळ, हळद-कुंकू अर्पण करावे
५.लक्ष्मी मंत्र किंवा “ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः” जप करावा
६.शक्य असल्यास दान करावे
अष्टलक्ष्मी पूजा ही केवळ धनप्राप्तीसाठी नसून जीवनातील सर्वांगीण समृद्धीसाठी महत्त्वाची आहे. अक्षय तृतीया हा दिवस या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने अष्टलक्ष्मीची आराधना केल्यास जीवनात सुख, यश आणि समाधान नक्कीच प्राप्त होते.









