विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; उद्धव ठाकरे पुन्हा रिंगणात उतरणार का?

---Advertisement---

 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांचे लक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा रिंगणात उतरणार का, या प्रश्नाकडे लागले आहे. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने ते पुन्हा सभागृहात येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील ९ नियमित जागांसह एका पोटनिवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.


सध्याच्या संख्याबळाचा विचार करता भाजपला ५, शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेसला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली जाणार का, यावर संपूर्ण समीकरण अवलंबून असल्याचे मानले जात आहे. पक्षांतर्गत स्तरावरही त्यांनी पुन्हा विधान परिषदेत यावे, असा दबाव असल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषद सदस्यत्व स्वीकारले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपत असताना ते पुन्हा निवडणूक लढवणार का, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यांनी उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे संकेत राजकीय सूत्रांकडून मिळत आहेत.


दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजपचे २३१, Eknath Shinde यांच्या शिवसेनेचे ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४० असे भक्कम संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे संख्याबळ ४६ असल्याने त्यांना एकच जागा निश्चित मिळू शकते, तर दुसऱ्या जागेसाठी अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे.
निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २३ एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल, ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २ मे रोजी छाननी होणार असून ४ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. १२ मे रोजी मतदान व मतमोजणी होऊन १३ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.


या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा निर्णय ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---