---Advertisement---

जळगावात महिलेने गळफास घेत जीवनयात्रा संपवली

by team

---Advertisement---

जळगाव : शहरात एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी प्रकार घडला. ही घटना महाबळ परिसरातील देवेंद्र नगरात रविवारी ( २५ मे) दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शबाना जावेद तडवी (वय ४५, रा. देवेंद्र नगर, संत गाडगेबाबा चौक परिसर, महाबळ, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.

शबाना तडवी ह्या आपल्या कुटुंबासह देवेंद्र नगर येथे दुमजली इमारतीत राहत होत्या. या दुमजली घरात खालील भागात शबाना तडवी यांचा भाऊ राहतो. तर वरच्या मजल्यावर शबाना या राहतात. रविवारी घरी त्यांची मुलगी घरीच होती. दुपारी शबाना यांनी त्यांच्या मुलीला कपडे बदलून येते सांगून दुसऱ्या खोलीत गेल्या. तेथे शबाना तडवी यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

काही वेळाने परिवारातील सदस्यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा नुकताच सरकारी नोकरीत लागला आहे. तर मुलगी शिक्षण करीत आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment