---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात नुकतीच एका आदिवासी महिलेची भररस्त्यात प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. अशातच पुन्हा अमळनेर तालुक्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दरम्यान, सुदैवाने ग्रामस्थांनी वेळीच मदतीला येऊन महिलेसह बाळाचे प्राण वाचाविले आहेत. मात्र यातून प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
नेमक काय घडलं ?
पती घरी नसताना प्रसूती वेदना सुरू झाल्याने आपल्या तीन लेकरांसह एक गर्भवती महिला बॅग पाठीवर घेत मध्यरात्री अंधारात तब्ब्ल एक किलोमीटर पायवाट तुडवत ती मदतीसाठी सारबेटे खु. पोहचली. प्रसूती वेदना अधिकच तीव्र झाल्याने गावातीलच महिलांनी मदतीला धावत येत तीची एका घराच्या ओट्यावर प्रसूती केली. ही कहाणी आहे सारबेटे तांडा येथील संजना शांताराम राठोड या महिलेची सारबेटे तांडा येथील संजना शांताराम राठोड (वय ३०) या महिलेची प्रसूतीची तारीख जुलै महिन्यातील होती. तिचा पती चालक असून तो कामानिमित्त घरी नसल्याने ती आपल्या तीन मुलींसह राहत होती.
---Advertisement---
सोमवारी २३ रोजी रात्री ११ बाजेच्या सुमारास तिला वेळेआधीच प्रसूती वेदना सुरू झाल्या. रात्रीच्या वेळी पती घरी नसताना ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्र जाण्यासाठी तीने धाडसी निर्णय घेतला. एवढ्या रात्री तीने प्रसूतीसाठी जाण्याची तयारी केली. तीन मुलींसह पाठीवर बॅग लटकवून प्रसूती वेदना सहन करीत अंधारात वाट तुडवत सारबेटे खुर्द येथील खाजगी वाहन मालक विशाल ब्रह्मे यांच्याकडे पायी चालत पोहचली. सारबेटे तांडा येथील घर ते सारबेटे बु. येथील ब्रह्मे यांच्या घरातील सुमारे १ किलोमीटरचे अंतर तीने पार केले. येथे पोहचल्यावर साडेबाराच्या सुमारास संजनाला प्रसूत बेदना जास्त सुरू झाल्या १०२ला फोन केल्यावर वेळ जात असल्याने विशाल ब्रह्मे यांनी एखाद्याला बोलवून ढेकू येथे जाण्याची तयारी सुरू केली.
मात्र, प्रसूतीची वेळ जवळ आल्याने गावातील माता भगिनी एवढ्या रात्री तत्काळ तीच्या मदतीसाठी धावून आल्या. गावातील विद्या विशाल ब्रह्मे, सुईन हिराबाई वंजारी, खटूबाई ब्रह्मे, नंदाबाई बनसोडे वैजयंता ब्रह्मे, सरला ब्रह्मे आशासेविका कामिनी ब्रह्मे, शांताबाई ब्रम्हे बासह महिला भगिनींनी यावेळी धाव घेत मदत यावेळी धाव घेत मदत केल्याने ओट्यावरच संजना हिची यशस्वी प्रसूती झाली व तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर विशाल ब्रह्मे ज्ञानेश्वर ब्रह्मे, अनिकेत ब्रह्मे, उपसरपंच राजेश पाटील व ग्रामपंचायत सदस्य देशमुख वंजारी, अनिल पाटील, भावलाल ब्रम्हे आदींनी तिला व बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्र ढेकू येथे नेले. त्याठिकाणी नर्सेस व आशा यांनी साफसफाई करून योग्य उपचार सुरू करण्यात आले. दोघांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संजना राठोड या महिलेने दाखवलेल्या हिमतीची व सारबेटे खु. येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या माणुसकीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.