---Advertisement---
‘तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल;’ रूपाली चाकणकरांनी अनेक नेत्यांना धमकावलं? रूपाली ठोंबरे पाटलांचा मोठा दावा…!
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण चांगलंच गाजलंय. याप्रकरणी दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आणि थेट आरोप केले आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या माध्यमातून महिलांवर थेट लैंगिक अत्याचाराचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
दहावी पास भोंदूबाबा अशोक खरातच्या ट्रस्ट वर तुम्ही आहात, तुमच्या माध्यमातून महिलांवर लैंगिक अत्याचार झाले तुम्हाला अटक झाली पाहिजे…. पण ती का होत नाही? कारण चाकणकरांनी ज्यांना पूजेला नेलं ते चाकणकरांना वाचवत आहेत. तुमचे पण व्हिडिओ व्हायरल करेल अशा धमक्या रूपाली चाकणकरांनी तरंगळ्यात ज्यांनी कापल्या त्यांना दिलेले आहेत त्यामुळे ते चाकणकरांना वाचवत आहेत.
रूपाली ठोंबरे पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या की, रूपाली चाकणकरांना कायदा कळत नाही संविधान कळत नाही. त्यांना वागण्याचा रीती रिवाज देखील घडत नाही. ज्यांना राज्य महिला आयोगाच्या पदाची गरिमा कळली नाही. त्यांनी 28 दिवसांनी बोलू द्या केव्हा 280 दिवसांनी बोलू द्या त्यांच्याकडे बोलायला काहीही शिल्लक नाही. रूपाली चाकणकरांनी पुरावे देऊन बोलावं. पोलीस चाकणकर आणि त्यांच्या परिवाराला वाचवत आहेत. यासह रूपाली चाकणकरांच्या टोळीतल्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे.









