मनरद येथील युवकांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

by team

नंदुरबार – जिल्ह्यातील  शहादा तालुक्यातील मनरद येथील असंख्य युवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा देऊन स्वागत केले.

शहरातील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे तसेच संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांनी पक्ष प्रवेश केला. यात गणेश संतोष माळी, मनोज राजेंद्र पाथरवट, सुकदेव पुना कोळी, धनराज अर्जुन कुवर, बापु पुना कोळी, विनोद खंडु कोळी, विश्वनाथ अर्जुन कुवर, रामदास संतोष माळी, गणेश राम पाथरवट, महेंद्र विजय कोळी, योगेश सिकंदर भिल, रविंद्र भगवान माळी, तेजस भिमराव निकुंभे, संतोष अर्जुन ब्रामणे, जयेश अशोक निकम, योगेश विठ्ठल कोळी, निलेश मुकेश सावळे, किरण गजमल कोळी, ईश्वर सुदाम भिल, मनोज काशिनाथ कोळी, मोहनलाल तुळशिराम जाधव, जितेंद्र विजय कोळी, अजय नामदेव कोळी, सागर किरण सोनवने, अक्षय काशीनाथ कोळी, हिम्मत खंडू कोळी, आकाश बापू कोळी यांनी पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी राजरत्न बिरारे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पेंढारकर, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, जहीर शेख, लोटन धोबी, हिरालाल अहिरे, युवा सेना शहरप्रमुख सागर चौधरी, माजी नगरसेवक रवींद्र पवार, मनलेश जयस्वाल, सुनील बिऱ्हाडे, मुकेश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment