जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत १२ संधी उपलब्ध

---Advertisement---

 

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील युवकांसाठी १२ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांना दरमहा ९ हजार रुपयांचे मानधन दिले जाईल. तसेच, इंटर्नशिप सुरू करताना एकरकमी ६ हजार रुपयांची आर्थिक मदतही देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील भारत पेट्रोलियम, डाबर इंडिया लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या प्रमुख कंपन्यांमध्ये या संधी उपलब्ध आहेत. दहावी, बारावी, डिप्लोमा किंवा पदवी शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

इच्छुकांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे संपर्क साधता येईल. तसेच, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ येथे प्रत्यक्ष भेट देऊनही माहिती मिळवता येईल. याबाबत सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---