---Advertisement---
प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीचं लैंगिक शोषण केलं, शरीर संबंधांचे व्हिडिओ स्वतःच रेकॉर्ड केले. आणि सर्व व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप वर व्हायरल झाले.
अचलपूर-परतवाडा या शहरात एका तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं त्या तरुणीचं लैंगिक शोषण केल्याची घटन उघडकीस आली आहे. विशेष बाब म्हणजे या घटनेमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेले शरीरसंबंधांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. यात सुमारे 180 हून अधिक मुलींचे 350 व्हिडिओ असल्याचा दावा हा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
अचलपूर-परतवाडा शहरात घडलेल्या या घटनेतील संशयित आरोपीने तरुणी सोबत जे शारीरिक संबंध ठेवले त्याचे व्हिडिओ स्वतः चित्रित केले होते. आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तरुणीला ब्लॅकमेलिंग करून आयुष्य उध्वस्त केल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे. यासह अनेक तरुणींचा यात सहभाग असल्यास समोर येत आहे. आणि आरोपीही केवळ एक नसून त्याचे काही साथीदार असण्याची देखील शक्यता आहे.
हे घाणेरडे कृत्य चव्हाट्यावर येताच संशयित आरोपी हा कुटुंबासह शहरातून फरार झाला आहे. त्याच्या राहत्या घराला सध्या कुलूप आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या प्रकरणाचं चौकशी करण्याचं मोठं आव्हान निर्माण झाल आहे. मात्र अद्याप कोणतीही पीडित तरुणी ही समोर आलेली नाही. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ हाच प्रमुख पुरावा म्हणून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी मागणी सध्या परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
याबाबत खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी लेखी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी निवेदन देताना म्हटला आहे की, महंमद अयान आणि महंमद झोयान या दोन तरुणांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीची तपास चक्र हे फिरवली आहेत. सध्या दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे. ते मिळून आल्यानंतर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल आहे.
या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार हे मिळालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असल्यास पीडित तरुणींनी घाबरून न जाता पोलिसांकडे तक्रार करावी दाद मागावी अस आव्हान अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केला आहे. तसंच हे प्रकरण संवेदनशील असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन करण्यात आला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना जाळ्यात अडकवून हॉटेलमध्ये त्यांच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केलं जात होतं. आणि यातील काही मुलींना मुंबई-पुण्यासारख्या शहरात विकण्याचा कट देखील रचला जात असल्याचं समोर आल आहे. त्यामुळे ज्या मुली ह्या प्रकाराला विरोध करतील त्या मुलींना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या जात असल्याचा आरोप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.









