काँग्रेसचे जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे यांचा भाजपात प्रवेश

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग येत आहे. यात काही नेते दुसऱ्या पक्षांत प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी आपल्या समर्थकांसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला.

भाजपा प्रवेश प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती होते. यावेळी त्यांच्यासह जिल्हा बँक संचालक विनोदकुमार पाटील, माजी जि.प. सदस्य आर. जी. पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन अमोल भिरूड, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, माजी सरपंच विठ्ठल सुर्यवंशी, गजानन सोनार आदी होती.

यांच्यासह भाजपा संघटन मंत्री रवि अनासपुरे, भाजपा ज्येष्ठ नेते राजेंद्र फडके, आ. अमोल जावळे, प्रदेश महिला सचिव डॉ. केतकी पाटील, माजी जि प अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, भरत पाटील आदी उपस्थित होते.

प्रभाकर सोनवणे गेली २९ वर्षापासुन यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, २० वर्ष जि.प. सदस्य, काँग्रेस गटनेते, जिल्हा उपाध्यक्ष अशी वाटचाल सुरू होती. पण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकास व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका व महाराष्ट्राची प्रगती तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात प्रभाकर सोनवणे यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी नितीन सपकाळे, किरण तायडे, विनोद कोळी, अनिल पाटील, योगेश कोळी, शेखर तायडे, समाधान कोळी, सिताराम कोळी, प्रमोद सोनवणे, बाळू शिंपी, प्रविण सोनवणे आदींनी देखील भाजपात प्रवेश केला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment