---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किमतींचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी जलद गतीने तपासचक्र फिरवून १२ तपासात चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बु. येथील रहिवाशी असलेले वैभव विकास पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीचे देव, मोबाईल फोन, रोख रक्कम व मोटारसायकल असा एकूण ५६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे (२३ जून) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ अशोक जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत अवघ्या १२ तासांत दोन आरोपींचा छडा लावण्यात आला. ताब्यात घेतलेले आरोपी पुढीलप्रमाणे गोपाल उर्फ सुरेशसिंग सिमाभाई सोलंकी , गणेश सिमाभाई सोलंकी (दोघेही रा. चिखल्या, ता. अंजड, जि. बडवाणी, मध्यप्रदेश; सध्या राहीवासी सिनफाटा, हलखेडा, ता. मुक्ताईनगर) दोन्ही आरोपी गेल्या १० वर्षांपासून स्थानिक शेतकऱ्यांकडे काम करीत होते.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, आणि ५ हजार रुपये किमतीचे चांदीचे देव असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोहेकॉ अशोक जाधव, पो.ना. प्रदीप इंगळे, हरीश गवळी, पो.अं. अनिल देवरे, सागर साबे व प्रविण जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.